वर्धा : नगर परिषद हद्दीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात शासकीय मालकीच्या जागेवर पेट्रोल पंपाचे बांधकाम प्रस्थापित आहे. ही जागा पेट्रोल पंप बांधकामाकरिता
उचित नाही, येथे जवळच क्रीडांगण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. या पुतळ्याच्या सभोवताल वर्षातून अनेकदा आंबेडकरी समुदायाचे कार्यक्रम होतात. यामळे या चौकातील पेट्रोल पंपाची परवानगी रद्द करावी अशी मागणी भीम आर्मानि राज्यमंत्री बच्चू कडू यांना निवेदनातून केली.
प्रस्तावित पेट्रोल पंपाला काही शासकीय विभागाकडून हरकती नोदविण्यात आल्या परंतु, या हरकती रद्द करण्यासाठी शिथिलतेचे मागणी संबंधितांकडून करण्यात येत आहे. ठाराबिक जागेसाठी आग्रही राहून शिथिलतेची मागणी करणे ही बाब आंबेडकरी जनतेच्या तर्क शक्तीच्या बाहेर आहे. त्यामुळे सदर कृतीतून आंबेडकरी समुदायाला त्याच्या कार्यक्रमापासून वंचित करणे, त्यांच्यावव दडपण आणून त्यांना कार्यक्रमांपासून वंचित ठेवण्याचा प्रकार होत असल्याचा आरोप भोम आमींच्या वतीने करण्यात आला आहे. त्यामुळे
निमबाह्य पद्धतीने आणि नियमांना शिथिल करून प्रस्तावित पेट्रोलपंपाच्या बांधकामाची परवानगी देण्यात येऊ नये. याकडे दुर्लक्ष झाल्यास आम्ही त्याच पेट्रोलपंपावर परवानगी देणाऱ्याचा निषेध नोंदविण्यासाठी आत्मदहन करू असा इशारा त्यांनी निवेदनातून दिला आहे. यामुळे या विषयाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे ही संपूर्ण आंबेडकरी जनतेची मागणी आहे. जर प्रशासन या विषयाकडे गंभीरपणे पाहत नसेल तर जिल्ह्यातील सर्व आंबेडकरी पक्ष, संघटना एकत्रित होऊन तीन्र आंदोलन करू असे निवेदन भोम आर्मी जिल्हाध्यक्ष आशीष सोनटक्के, बंटी रंगारी, जिल्हा प्रभारी शेहेबाज शेख, दीक्षित सोनटक्के व इतर आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.