

वर्धा : बैलाला शिळे अन्न खाऊ घातल्याच्या कारणातून व्यक्तीस काठीने मारहाण करून जखमी केले. खरांगणा ठाण्यांतर्गत येणाऱ्या चाका मजरा येथे ही घटना घडली. रमेश सहारे रा.चाका मजरा, असे जखमीचे तर अतुल पेढेकर रा. चाका मजरा, असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश सहारे व अतुल पेढेकर एकाच गावातील असून त्यांचे शेत एकमेकांच्या धुन्याला लागून आहे. रमेश सहारे शेतात धुऱ्यावर बैल चारत होते. त्यावेळी तिथे अतुल पेढेकर आला. तू माझ्या बैलाला शिळे अन्न खाऊ घातल्याने ते बिमार पडले, असे म्हणून पेढेकर याने हातातील काठीने रमेश सहारे यांना मारहाण केली. यात ते जखमी झाले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.