वर्धा : महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या नेतृत्वात २ फेबुवारीला जिल्ह्यातील तसेच राज्यातील राजपत्रित अधिकारी आपल्या विविध न्याय्य मागण्यांसाठी एक दिवसीय रजा आंदोलन करणार आहेत. या आंदोलनात वर्धा जिल्ह्यातील सुमारे ५५ अधिकारी सहभागी होणार असल्याचे संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष तथा वर्धा येथील उपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे यांनी सांगितले.