

वर्धा : शस्त्राच्या धाकावर युवकाच्या गळ्यातील गोफ हिसकावून दोघांनी पळ काढला. ही घटना साईमंदिर रोडवरील समर्थवाडी परिसरात घडली. आयूष साहू हा वडिलांच्या औषधांच्या दुकानातून दुचाकीने घरी जात असताना दोन व्यक्ती दुचाकीने मागून आले . त्यातील एका व्यक्तीने शस्त्राचा धाक दाखवून आयूषच्या गळ्यातील ५० हजार किमतीचा गोफ हिसकावून नेला. या प्रकरणी शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.