
वर्धा : जिल्ह्यातील महत्त्वाचे प्रशासकीय महसूल घटक असलेले पटवारी कर्मचारी गेल्या सहा महिन्यांपासून नियमित पगार नाहीत. आणि त्याच्या इतर मागण्या शासनस्तरावर प्रलंबित आहेत. त्यामुळे त्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हास्तरावर पटवारी संघटनेने 28 जानेवारीपासून आंदोलन सुरू केले. आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात 28 जानेवारी सर्व पटवारींनी शर्टवर काळी पट्टा लावून आंदोलन सुरू केलेले आहे.
दुसर्या टप्प्यात 8 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील सर्व तहसीलांचे उपविभागीय अधिकारी कार्यालयासामोर काळ्या फिती लावून निदर्शने करतील. हे लक्षात घेता जिल्हा पटवारी संघटनेच्या नेतृत्वात जिल्हा दंडाधिकारी विवेक भीमनावार यांना आपल्या विविध मागण्यांबाबत निवेदन सादर केले.
कोरोना काळात प्रशासनाच्या सर्व जबाबदार्या पार पाडत पटवार्यांनी आपली कामगीरी बजावली मात्र गेल्याय सहा महिन्यापासुन त्यांचे वेतन थांबविन्यात आले असल्याने त्यांची आर्थीक परिस्थीती खालावलेली आहे. अनेकांना वाहन कर्ज, होमलोनच्या किस्त भरातात येत नसल्याने पटवारी आता पुरता मेटाकुटीस आलेा आहे. राज्य प्रशासनाने या संदर्भात न्याय न दिल्यास पटवारी संघटना आपले आंदोलन तीव्र करणार आहे.