

पवनार : येथील पवनार क्रिकेट क्लबद्वारा राधा सिटी भाग -१ च्या मैदानावर भव्य प्लास्टिक बॉलच्या दिवसपाळीतील सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे . या क्रिकेट सामन्यांचा उद्घाटन सोहळा शनिवार दि ३० जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात आला असून या स्पर्धेत प्रथम पुरस्कार १५ हजार १ , द्वितीय पुरस्कार १० हजार १ तर तृतीय पुरस्कार ५ हजार १ रुपये असून मॅन ऑफ द सि- रीज, बेस्ट बॅट्समन , बेस्ट
बॉलर, मॅन ऑफ दी मॅच बेस्ट सिक्सर, बेस्ट फिल्डर, बेस्ट अंपायर अशी पुरस्कारांची विविध प्रारुपे आहेत . उद्घाटन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून आ . डॉ . पंकज भोयर , रविंद्र कोटंबकार, पोलिस निरीक्षक कांचन पांडे, पुरुषोत्तम टोणपे, माजी जि.प. सदस्य सुनिता ढवळे, सरपंच शालिनी आदमने, उपसरपंच राहुल पाटणकर, माजी सरपंच अजय गांडोळे, सतिश जाधव, माजी सरपंच इंदु हुलके, शिवसेना शहर प्रमुख लखन लोंढे , मनसेचे शुभम दांडेकर, उपसभापती संदीप किटे, बजरंग दलाचे बबलु राऊत, तंटामुक्ती अध्यक्ष किरण गोमासे, प्राचार्य नितेश कराळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यगण उपस्थित राहणार आहे .
क्रिकेट सामन्यांच्या आयोजनाकरीता पवनार क्रिकेट क्लबचे अध्यक्ष विलास छापेकर, उपाध्यक्ष संजय नेहारे, सचिव गजु लोहकरे, सहसचिव महेंद्र पे टकर, सल्लागार विशाल नगराळे, आयोजन कमिटी सदस्य शुभम कापटे, रज्जत वैद्य, नितीन नामदार , प्रफुल्ल मुंगले , सुरज वैद्य, सचिन नामदार, प्रीतम हिवरे, ऋषिकेश चाटे, आकाश मुडे, सचिन सोनटक्के , वैभव गोमासे, निलेश वाघमारे, संकेत कुत्तरमारे, अनुप नगराळे, प्रज्वल फुलझेले, आकाश राऊत, इजाज शेख, प्रशांत वानखेडे, सातघरे, विशाल भुजाडे, राहुल आशिष इखार, प्रज्वल थुल, सुरज वाढवे, अमोल हुलके, सुमित उमाटे, विक्की वाढवे, प्रफुल्ल भस्मे, प्रेम वाघमारे, जयंत झाडे , गजु अवजेकर अथक परिश्रम घेत आहेत.
या सामन्यात जास्तीत जास्त चमुनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केलेले आहे. अधीक मातीकरीता सोनू मुंगले यांच्याशी संपर्क साधावा. मोबाईल क्रमाक 8055866382