वर्धा : दिवसेंदिवस रासायनिक खताचा वापर वाढत आहे त्यामुळे जमिनीचे आरोग्य धोक्यात आले असून त्याचा मानवी जीवनावर परिणाम पडत आहे म्हणून शेतकऱ्यांनी पिकामध्ये खताचा समतोल वापर करणे आवश्यक असून एकात्मिक खत व्यवस्थापनाचे सूत्र अवलंबून उत्पादन खर्च कमी करुन उत्पादन वाढवणं आवश्यक आहे असे कृषी सहाय्यक प्रशांत भोयर यांनी सांगितले.
सातोडा येथे जागतिक मृदा दिनानिमीत्य आयोजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी संदीप गावंडे, संजय कोंबे, संजीत गावंडे, दिलीप सायरे, प्रशांत कार्लेकर, सचिन ठाकरे, चिंतामण येवले यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच माती नमुने कसे घ्यावे पिकाला एकूण किती प्रकारच्या अन्न घटकांची आवश्यकता आहे हे त्यांनी समजून सांगून मुलंद्रव्व्याची कमतरता कशी ओळखावी त्यावर काय उपाययोजना करावी याबद्दल विस्तृत मार्गदर्शन शेतकर्यांना करण्यात आले.
यावेळी मंडळ कृषी अधिकारी जांबुवंत मडावी यांनी कपाशी पिकावर येणाऱ्या लाल्या रोग व बोण्डअळी बद्दल शेतकर्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
५ डिसेंबर हा जागतिक मृदा दिन म्हणून कृषीविभाकडून महाराष्टभर साजरा केला जातो. जिल्ह्यात सर्वत्र हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने सातोडा येथे जागतिक मृदा दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवारातील शेतकर्यांची उपस्थिती होती.