वर्धा : गोंदापूर शिवाराला जोडून असलेल्या शिवपांदण रस्त्यावर कान्हापूर येथील एका शेतकऱ्याने अतिक्रमण केले असून ते अतिक्रमण तत्काळ काढण्यात यावी , अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे निवेदनातून केली आहे.
गोंदापूरला जोडून असलेली शिवपांदण ही वर्धा व सेलू तहसीलला शिंदे जोडून आहे. गोंदापूर मौजातील सर्वे शेतकऱ्यांनी नं .३ ९ / १ हे शेत सेलू येथील लिलाबाई तत्काळ कुंभारे यांचे असून सूर्यभान बेले या उपविभागीय शेतकऱ्याने ते ठेक्याने घेतले आहे. रस्त्यालगत असलेल्या नालीच्या बाहेर त्यांनी कुंपण टाकले असून ते मोकळे करुन द्या असे म्हटल्यास शिवीगाळ व दमदाटी करीत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याबाबत वर्धा व सेलू येथील तहसीलदारांकडे तक्रार दिली असून या याकडे लक्ष दिल्या जात नसल्याचा आरोप भगवान ठोंबरे, पुरुषोत्तम ठोंबरे, केशव ठोंबरे, ज्ञानेश्वर ठोंबरे, भगवान पाटील, सीताराम पाटील, कवडू भोयर, सतीश ठोंबरे, रामदास ठोंबरे, सदाशिव रघाटाटे, वसंत मेहर, सुभाष भट, प्रमिला मेहर, आशिष भोयर, गंगाधर घुगरे, सुनीता उमटे, मोतीराम भोयर, पुरुषोत्तम उमाटे, अनिल भोयर, रामभाऊ शिंदे, सुभाष मुडे, पांडुरंग ढगे शेतकऱ्यांनी केला आहे. शिवपांदण तत्काळ मोकळी करून न दिल्यास उपविभागीय अधिकारी वर्धा व सेलू यांना निवेदन देणार असल्याचा इशारा निवेदनातून दिला आहे. येत्या काही दिवसांत जर अतिक्रमण काढण्यात आले नाही, तर आंदोलन करण्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी निवेदनातून दिला आहे.यावर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.