

वर्धा : विरूळ ( आकाजी ) येथून जवळच असलेल्या मारडा गावाजवळ कालव्यात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. मृत हा ३५ ते ४० वयोगटातील असून या घटनेची नोंद पोलिसांनी घेतली आहे . दोन दिवसांपूर्वी या कालव्यात सुमारे मृतदेह दहा फूटपर्यंत पाणी होते. मंगळवारपासून रुग्णालयात कालव्याचे पाणी ओसरण्यास सुरुवात पुलगाव झाली आहे. अशातच कालव्यात पुलाच्या शेजारील झुडूपात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह असल्याचे या भागातून जाणाऱ्यांना दिसून आले . त्यानंतर घटनेची माहिती ग्रामस्थांना देत पुलगाव पोलिसांना देण्यात आली . माहिती मिळताच पुलगावचे ठाणेदार रवींद्र गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. शिवाय ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह कालव्याबाहेर काढून पंचनामा करीत मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. या प्रकरणी पुलगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली असून वृत्तलिहिस्तोवर मृताची ओळख पटली नव्हती.