देवळी : तालुक्यातील गौळ येथील संत लोटांगण महाराज चातुर्मास व याञा महोत्सव कोरोना विषाणूमुळे वारकऱ्याच्या आरोग्याच्या दृष्टीने व स्थानिक प्रशासनाचे मार्गदर्शन आणि सुचनेच्या आधारे यावर्षी होणारे कार्यक्रम रद्द करण्यात आले.
विश्वव्यापक विचारधारेची जोपासना करणारा जगाला शांतीचा व समतेचा आणि समस्त वारकऱ्याचा प्रभाव अमुल्य ठेवा असा संदेश देणारे श्रीसंत लोटांगन महाराज चार्तूमांस व यात्रामहोत्सव हरवर्षीप्रमाणे यावर्षीही ता. १३ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. मात्र वाढत्या कोरोनामुळे यात्रा महोत्सव कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. त यामुळे महाप्रसाद दहीहांडी, दिंडी आदी कार्यक्रम होणार नाही. यामुळे गावातील पंरपरेला प्रथमच छेद बसणार आहे.
दिवाळी, दसऱ्यापेक्षा ज्ञानेश्वरी पुण्यतिथीला महत्व दिले जाते. या कार्यक्रमात सर्व समाजातील लोक सहभागी होवून माणूस आमची जात म्हणून इतर गावातील लोकांना प्रत्यय देतात. असा हा महोत्सव प्रतीवर्षी होणारा श्रीसंत लोटागण महाराज चातूर्मास व यात्रामहोत्सव सोहळा रद्द झाल्याने याची सर्व वारकरी मंडळींनी यात्रेकरिता येणारे दुकानदार मंडळीनी नोंद घ्यावी असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष रामदास पवार व उपाध्यक्ष नरेश घोंगे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाव्दारे केले आहे.