देवळी : नवरात्र उत्सवाला सुरवात झाली असुन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जसा गणेश उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला अगदी त्याच धर्तीवर आगामी काळात होणारे धम्मचक्र प्रवर्तन दिन, दुर्गा उत्सव, शारदा उत्सव, नवरात्र उत्सव साजरा करावा असे आवाहन देवळी पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक नितीन लेव्हरकर यांनी शातंता कमेटीच्या बैठकीत केले.
प्रशासनाने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करुन नवरात्र उत्सव सोबतच धम्मचक्र प्रवर्तन दिन सुध्दा साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे. पोलीस स्टेशनमधे शांतता समितीची बैठक पोलिस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांच्या उपस्थितीत पार पडली.
यावेळी देवळी पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस पाटील, सार्वजनिक मंडळे, तंटामुक्ती समिती पदाधिकारी यांची बैठक घेवून सर्वांना शासनाच्या व जिल्हाधिकारी वर्धा यांच्या सण-उत्सव संबंधित मार्गदर्शन सुचनाबाबत माहिती देण्यात आली.
यावेळी बैठकीत मार्गदर्शन करतांना ठाणेदार लेव्हरकर म्हणाले की देशात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कायम आहे. त्यामूळे सर्वांनीच शासनाच्या नियमांचे पालन करावे. सामाजिक जबाबदारी ओळखून नवरात्री उत्सव साधेपणाने साजरा करावा, नवरात्री उत्सवामध्ये आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहीराती प्रदर्शन करण्यात यावे तसेच माझे कूटुंब माझी जबाबदारी या मोहिमेबाबत समाजामध्ये जनजागृती करण्यात यावी असे सर्वांनान सांगण्यात आले.