संजय धोंगडे
सेलू : विदर्भातील प्रतीपंढरी श्रीक्षेत्र घोराड येथील पुरातन भवानी माता मंदिरात शारदीय नवरात्र उत्सवाला प्रारंभ घटस्थापनेने करण्यात आला. कोरोणाचे संकट पाहता यावर्षी साध्या पद्धतीने धार्मिक वातावरणात तुळजाभवानी देवीची पूजा अर्चना करण्यात आली. निवडक लोकाच्या उपस्थितीत दुपारी बारा वाजता विधीवत घटस्थापना करण्यात आली. मंत्रोपचाराने आई भवानीचा उदो-उदोचा जयघोष आणि सर्व पूजाअर्चा करण्यात आली.
मंदीराचे मागील बाजूस असलेल्या सप्तश्रृंगी व जगदंबा देवी मंदिरात साधेपणाने पुजा अर्चा करून घटस्थापना करण्यात आली कोरोणामुळे दरवर्षी होणारी सजावट, रोषणाई करण्यात आली नसून कार्यक्रमावर पांबधी असल्याने मंदीर परीसरात कायम शांतता असल्याचे दिसून येते परिसरात सर्वच ठिकाणी ही परिस्थिती पाहायला मिळत असून भावीक दर्शनासाठी येथे येतात पण सुरक्षेच्या कारणास्तव सोशल डिस्टन्सींगचे पालन करत दुरूनच दर्शन घेऊन परतीचा मार्ग धरत आहे.