

महेन्द्र जुन्नाके
खरांगणा (मोरांगणा) : मजरा येथील शेतातील विहिरीत पडलेल्या वयोवृद्ध महिलेला येथील काही युवकांनी जीव धोक्यात घालून विहिरीत उतरुन सुखरुप बाहेर काढले. ही घटना मजरा ते खरांगना रोडलगत असलेल्या शेतशिवारात सोमवार (ता. १९) साडेआठ वाजताच्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार मजरा येथील ७० वर्षीय वृद्ध महिला हिचे पाच दिवसापासून मानसिक संतुलन ढासळल्याने ती वेडसर सारखी करत असतानाच मजरा ते खरांगणा रोड वरील श्री लाकडे यांच्या शेतातील विहिरीत पडली व विहिरीला जास्त पाणी असल्यामुळे विहिरीत असलेल्या मोटारच्या पाट्याला लटकली गेली त्यानंतर तिने आरडाओरड केल्याने रस्त्याच्या बाजूने बकरी चालणाऱ्या व्यक्तीला विहिरीतून आवाज येत असल्याचे कळले लगेच त्याने विहिरीत जाऊन पाहिले असता सदर महिला लटकून असल्याचे दिसले. त्याने गावातील युवकांना मदतीसाठी बोलवीले आणि त्यांच्या सहकार्याने त्वरित विहिरीत उतरुन सदर वृद्ध महिलेला सुखरूप बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.
या सर्व युवकांचे गावातील नागरिकांनी अभिनंदन केले. यामध्ये मनोज रुईकर, संतोष पारिसे, आशिष शिरसागर, धनंजय बोंद्रे, योगेश ढवळे, विलास नारबाची, हरिदास कौरती यांनी महिलेचा जीव वाचवीण्यात मदत केली.