सेलू : तालुक्यातील कोलगाव लगत असलेल्या चिंचोली शिवारात जंगली डुकराचा बंदोबस्त करण्यासाठी शेताच्या सभोवताल लावलेल्या विद्युत प्रवाहला स्पर्श झाल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवार (ता. ११) रात्रीच्या सुमारास घडली. गणेश करणाके वय २४ असे मृत यूवकाचे नाव आहे.
कोलगाव येथील चौघेजण खेकडे पकडण्यासाठी शेतालगतच्या नाल्यावर गेले असता गणेश करणाके वय २४ याचा या शेतातील ताराणा स्पर्श झाल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली सदर शेत शेतकऱ्याने ही शेती दुसऱ्याला ठेक्याने दिली असल्याचे कळते. या घटनेचा प्राथमिक तपास सलू पोलिस करीत आहे.