अरे…बापरे केस कापाच्या पैशात झाली तब्बल दुप्पट वाढ; सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर! कोरोनाचा असर

मोहन सुरकार

सिंदी (रेल्वे) : कोरोनाच्या महामारीत लॉक डाउनमुळे अगोदरच सर्वांचे कंबरडे मोडले आहे. आर्थिक संकटाचा सर्वाना सामना करावा लागत आहे अशा बिकट परिस्थितीत सर्वाना गरजेचे असलेल्या केस कापण्यासाठी तब्बल दुप्पटहुनही अधिक पैसे मोजावे लागत आहे.

शहरातील सलुन व्यवसायीकानी दाढी कटींगचे दर दुप्पट केलेले आहे. सविस्तर वृत असे की कोरोना महामारीत मार्च महिन्यापासून लॉकडाउनमुळे फक्त बोटावर मोजण्याइतके व्यवसाय वगळता असंख्य व्यवसाय पुर्णतः बंद होते. याची झळ सर्वानाच सहन करावी लागली. यात मोठे व्यवसायीकांनी हा तोटा सहन करु शकले मात्र ज्या छोट्या व्यवसायीकांची चुलच यातुन पेटत होती त्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले.

त्यांच्या समोर जगण्या-मरण्याचा प्रश्नच उभा ठाकला होता. यात सर्वात छोटेखानी व्यवसाय म्हणून ज्या व्यवसायाची गनना होते तो म्हणजे सलुन व्यवसाय होय. अगोदर शहरात बोटावर मोजण्या इतकेच केस कपण्याची दुकाने होती. मात्र मधील काळात दूरचित्रवाणीची संच घरोघरी आले आणि फिल्म दुणीया आणि त्यातील कलाकार हिरोचा काही जास्तच प्रभाव समाजमनावर जानवाला लागला तरुनापासुन म्हातार्‍यांन पर्यंत सर्वच या हिरोचे रहनसहन खानपान कपडेलते आणि हेअर स्टाईलचे सर्रास अनुकरन करु लागले यामुळे फॅशनचे असे काही नविन जगच विकसीत होत गेले की विचारुच नका.

यातुनच नवनवीन हेअरस्टाईल जन्माला येवू लागल्या परिणामता घरी जाऊन केस कापुन अन्नाजाच्या स्वरुपात मेहनताना घेवुन सुरु असलेल्या सलुन व्यवसायाला “अच्छे दिन” आले आणि पीढीजात व्यवसाय करनारा न्हावी समाजाचे तरुन या आपल्या या पीढीजात व्यवसायाकडे आकर्षीत झाले. आणि प्रत्येक शहरात सलुन दुकानाची संख्या झपाटय़ाने वाढत गेली. याचा सिंदी रेल्वे शहरात सुध्दा असर जानवला. चार-दोन सलुन दुकान असलेल्या पंधरा हजार लोकसंख्येच्या सिंदी शहरात चक्क १५ ते २० सलून दुकाने थाटली. 

फॅशनच्या या आधुनिक युगामुळे सर्वाना ग्राहक सुध्दा मिळाला लागली. यातुन चांगला उदरनिर्वाह सुरु असतानाच यंदा कोरोना नावाच्या रोगाने आपले पाय पसरने सुरू केले आणि खबरदारीची उपाययोजना म्हणून शासनाने मार्च महीण्यापासुन कडक लाॅकडाऊनची अमलबजावनी संपूर्ण देशात सुरु केली.  यामुळे सर्व व्यवसायावर एकदम संक्रात आली. यात सर्वाची मोठी आर्थिक कोंडी झाली. कर्जाचे हप्ते, किरायाचे नियोजन, दुधवाला, किरानेवाला, पेपरवाला, केबलवाला, दवाखाना आदीचे नियोजन आवक नसल्याने कसे करावे असा मोठा प्रश्न सर्वांप्रमाने सलुन व्यवसायीका समोर उभा ठाकला.

यात मोठ्या व्यवसायीकानी कशीबशी आपली बाजू सांभाळली मात्र सलुन सारख्या छोटेखानी व्यवसायीकाचे कंबरडेच मोडले. त्यात भर ती काय तर शासनाने अॅनलाॅकची प्रक्रिया सुरू करताना सलुन व्यवसायीकाना उशीरा परवानगी दिली. शिवाय सरळ काॅन्टक येणारा व्यवसाय म्हणून खुब सारे नियम घालुन दिले. यामुळे या नियमाची अमलबजावणी करतांना या व्यवसायीकाचा खर्चात स्वाभाविकच वाढ झाली.

यामुळे सलुन व्यसायीकानी एकमताने आपल्या कामाचे दर वाढविण्याचा निर्णय घेतला मात्र ही वाढ फार मोठ्याप्रमाणात करण्यात आली असल्याने ग्राहकात कमालीची नाराजी दिसुन येत आहे. शिवाय ज्या गोष्टीसाठी दर वाढविले ती सुविधा शहरातील कोणताही सलुन व्यवसायीक देतांना दिसत नाही. याचा सरळ प्रभाव सलून व्यवसायातील ग्राहक संख्येवर झाला. ग्राहकांची संख्या निम्मी झाल्याची ओरढ शहरातील अनेक सलुन व्यवसायीक खाजगीत व्यक्त करीत आहेत.

मात्र दाम दुप्पटमुळे ही तुट भरुन निघत आहे. मात्र सिंदी सारख्या निमशहरी भागात जेथे शेती हा मुख्य व्यवसाय आहे तेथे हे दर सामान्यांच्या आवाक्या बाहेर असल्याची सल अनेकजनांनी व्यक्त केले आहे. यावर सलुन व्यवसायीकानी सारासार विचार करुन दर थोडे कमी करण्याची सिंदीवासीयांची मागणी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here