देवळी : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता तथा शासनाचे वेळोवेळी आदेश व सूचनाने माहितीची जनजागृती होण्याकरिता जिल्हा, तालुका प्रशासन व नगरपरिषद प्रशासन यांचे संयुक्त विद्यमाने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
नागरीकांनी स्वतःहून स्वःताची व आपल्या कुटूंबाची काळजी घेण्याकरिता शासनाचे माझी कुटूंब माझी जबाबदारी या मोहीमे अंतर्गत महात्मा गांधी यांची १५१ वी जयंतीच्या समारोप दिनी जिल्हा, तालुका प्रशासन व नगरपरिषद प्रशासन यांचे संयुक्त विद्यमाने सायकल रॉली व कोरोना विषयक चित्रायचे आयोजन करण्यात आले होते.
नगर परिषद, देवळी येथील प्रांगणातुन चित्ररथ व सायकल रॉलीला खासदार रामदास तडस . श्रीमती सुचिता मडावी , नगराध्यक्षा, नगर परिषद, देवळी यानी हिरवी झेंडी दाखवुन रॉलीला सुरुवात करण्यात आली.
सायकल रॉली व चित्ररथ देवळी शहरातील प्रत्येक वार्ड व प्रमुख रस्त्यातुन काढण्यात आली दरम्यान प्रत्येक वार्डातिल नगरसेवकानी या रॉलीचे स्वागत केले , सायकल रॉली व चित्ररथामार्फत जनजागृतीचा संदेश देण्यात आला.
यावेळी तहसिलदार राजेश सरवदे , अधिक्षक , नगर परिषद देवळी ज्ञानेश्वर शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी प्रविण धमाणे वैद्यकीय अधिक्षक विशाल लाडे, तालुका क्रीडा अधिकारी दळवणकर ठाणेदार नितिन लेव्हरकर, नायब तहसीलदार राजेंद्र देशमुख श्रीमती बाळुताई भागवत नगरपालीका प्रशासनातील सर्व सदस्य, अधिकारी व कर्मचारी तथा महसूल प्रशासनातले सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला.