
वर्धा : कोरोना काळात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल खानगांव (गोटाडे) येथील पोलीस पाटील मनोज वसंतराव हिवरकर यांचा सत्कार अल्लिपूर पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजीत करण्यात आला होता. येथील पोलीस निरीक्षक योगेश कामाले यांचे हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी पोलीस निरीक्षक श्री कामाले यांनी मनोगत व्यक्त करताना अल्लिपूर पोलीस स्टेशन मधील सर्वच पोलीस पाटिलानी आपआपला गाव सुरक्षित ठेवण्यासाठी कठोर मेहनत घेतली व गावात कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबत कोरोना या महामारिचा गावात शिरकाव होणार नाही याची खबरदारी घेतली. त्यामुळे आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गावात कोरोना आजाराचा प्रसार होण्यास आपण बराच प्रतिबंद लावण्यात यशस्वी झालो. त्यामुळे सर्वच पोलीस पाटलांचे त्यांनी कौतुक केले.
तसेच विशेष उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल खानगांव (गोटाडे)येथील पोलीस पाटील मनोज वसंतराव हिवरकर यांचा अल्लिपूर पोलीस स्टेशनच्या वतीने सत्कार केला. सत्कार प्रसंगी मनोगत व्यक्त करताना पोलीस पाटील मनोज हिवरकर यांनी खानगांव येथील समस्त गावकरी मंडळींनी दिलेल्या उत्तम प्रतिसादामुळे व त्याचबरोबर ग्रामपंचायत खानगांव कोरोना समिती, आरोग्य विभाग, तलाठी साहेब, ग्रामसेवक साहेब, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, नोडल अधिकारी, ग्रामपंचायत शिपाई, कोतवाल या सर्वाच्या सहकार्यामुळे, पोलीस निरीक्षक श्री कामाले यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार व पोलीस कर्मचारी यांनी दिलेल्या सहकार्यामुळे मी हे कार्य करु शकलो, म्हणुन सर्वाप्रति आभार व्यक्त केले. कोरोना लॉक डाऊन काळात सर्वच पोलीस पाटलांनी चांगले कार्य केल्यामुळे मी आजचा सत्कार प्रतिनिधीक स्वरुपात स्वीकारून सर्वच पोलीस पाटिल यांना समर्पण करत आहो असे सांगितले. याप्रसंगी श्री शिरभाते सर व सर्व पोलीस पाटील, पोलीस कर्मचारी उपस्थीत होते.