सेलू तालुक्यातील हिंगणी जवळ आढळून आली पिस्तूल! तीन जिवंत काडतूस; परिसरातील नागरिकांमध्ये दहशत

संजय धोंगडे

सेलू : येथील पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या हिंगणी बीट मधील हिंगणी ते हिंगणा रोडवरील वानर विहिरा गावाजवळील पाटबंधारे विभागाच्या कॅनलचे बाजूला आज सकाळी आठ वाजताच्या सुमारास एक पिस्तूल तसेच तीन जिवंत काडतुसे आढळून आल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे.

सविस्तर वृत्त असे की वानर विहिरा गावातील गुराखी सकाळी आठच्या सुमारास गुरे चारण्या करिता घेऊन गेला असता हिंगणा हिंगणी रोड वरील कॅनलचे बाजूला कव्हर बंद स्थितीत पिस्तूल तसेच तीन जिवंत काडतुसे ज्यावर मेड इन इटली असे नाव कोरले आहे.

तसेच 10-161 ऑटोमॅटिक 11 राऊंड असलेली पिस्तूल आढळून आली, गावातील महिला पोलीस पाटील यांनी सदर घटनेची माहिती सेलू पोलिस स्टेशनला देताच तत्परता दाखवीत सेलू पोलीस स्टेशनचे अधिकारी-कर्मचारी घटनास्थळावर रवाना होऊन स्पॉट पंचनामा करीत पिस्तूल तसेच तीन करतोस जप्त करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूर जिल्ह्यातील गुंड प्रवृत्तीच्या अज्ञात आरोपीने पाच ते सहा दिवसा अगोदर घटनास्थळावर फेकले असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे, सेलू पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात 1959 नुसार भारतीय हत्यार कायदा 7, 25 (1) गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप यांचे मार्गदर्शनात सेलू पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुनील गाडे, तसेच पोलीस उपनिरीक्षक पुंडलिक गावडे करीत आहे.

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर अप्पर पोलीस अधिकारी निलेश मोरे, उपविभागीय पोलीसअधिकारी पियुष जगताप, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निलेश ब्राह्मणे, ठाणेदार सुनील गाडे, तसेच वर्धा येथील श्वानपथक, नक्षल विरोधी पथक, अंगुलीमुद्रा पथक, दाखल झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here