

सेलू : एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने कोटंबा येथील अंगणवाडीत ७ ते ३० सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात आलेल्या पोषण अभियानाचा बुधवारी समारोप करण्यात आला.
कोटंबा येथील अंगणवाडीत ७ ते ३० सप्टेंबर या कालावधीत पोषण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने अंगणवाडी क्रमांक ६८ व इंदिरानगर येथे पोषण अभियानातंर्गत विविध प्रकारचे कार्यक्रम राबविण्यात आले.
पोषण सप्ताह काळात सर्वेक्षणातील घरांना भेटी देत पोषण आहाराविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच गरोदर व स्तनदा मातांना आहाराबाबत समुपदेशन करून लसीकरणाविषयी माहिती देण्यात आली. अंगणवाडीमध्ये परसबागेची निर्मीती करण्यात आली, कमी वजनाच्या बालकांना गृहभेटी देऊन माता व किशोरी मुलींना माग़दर्शन करण्यात आले.
सदर कार्यक्रम पर्यवेक्षिका सोनवणे व पाटील यांच्या मार्गदर्शनात अंगणवाडी सेविका शोभा चिडाम, ज्योत्स्ना तुमडाम, मदतनीस वंदना भुसारी यांनी राबविला. यावेळी सरपंच रेणुका कोटंबकार, ग्रामसेवक सुहास लंगडे, उपसरपंच अरविंद तुमडाम, ग्रा.पं. सदस्य रंजना राऊत यांच्या विशेष उपस्थितीत पोषण अभियानाचा समारोप करण्यात आला.