सेलू : तालुक्यातील कोटंबा येथे माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीमेला सरपंच रेणूका कोटंबकार यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. या मोहिमे अंतर्गत आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघरी जाऊन तपासणी, क्लोज कॉनटॅक्टचा शोध तसेच प्रभावी उपाययोजना करणार आहेत.
कोरोनाच्या समुळ उच्चाटनासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम प्रभावी अस्त्र ठरत आहे. गावपातळीवर देखील मोहीम राबविण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून आरोग्य विभागाचे कर्मचारी थर्मल स्कँनर व आँक्सीमीटरच्या माध्यमातून घरोघरी जाऊन तपासणी करीत आहेत.
तपासणी दरम्यान कोविड-१९ संदर्भात निकट संपर्काचा शोध घेतला जात आहे. लक्षणे आढळल्यास उपाययोजना केली जात आहे. सदर मोहिमेअंतर्गत कोटंबा येथे देखील आरोग्य कर्मचाऱ्यांचे पथक नेमून माझे कुटुंब माझी जबाबदारी, कोविडमुक्त महाराष्ट्र अभियान राबविले जात आहे.
या अभियानाला सरपंच रेणूका कोटंबकार यांच्या हस्ते नुकताच प्रारंभ करण्यात आला. आरोग्य पथक दररोज ५० घरी भेट देत आरोग्यविषयक मार्गदर्शन करीत आहे.
कोटंबा येथे सदर मोहिमेला प्रारंभ करताना सरपंच रेणूका कोटंबकार यांच्यासह आरोग्य पथकातील दिशा थुल समुदाय आरोग्य अधिकारी, सुनिता वाढवे आरोग्य सेविका तसेच दोन स्वंयसेवक प्रयत्नशील आहे.