

हिंगणघाट : केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी घोषीत केल्यामुळे शेतक-यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. कांदा उत्पादकांना याचा जबर फटका बसणार असल्याने कृषि पदवीधर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेश कडुस पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी पदवीधर संघटनेच्या विदर्भ प्रदेश युवती सचिव प्रतिक्षा थुटे यांनी हिंगणघाट येथील नायब तहसीलदार विजय पवार यांना कांदा निर्यातवरील बंदी उठवण्याचे निवेदन देऊन केंद्र सरकारच्या या निर्णयाचा विरोध दर्शविला आहे.
निवेदन देते वेळी वर्धा जिल्हाध्यक्ष भूषण तडस, जिल्हा उपाध्यक्ष राहुल चाफले, जिल्हा सचिव गणेश सहारे, जिल्हा संघटक हर्षल आवारी, हिंगणघाट तालुकाध्यक्ष प्रतिक बोकडे, तालुका संघटक प्रज्वल ठाकरे, तालुका कार्याध्यक गणेश विहीरकर, समुद्रपुर तालुका अध्यक्ष निखील शेंडे, हिंगणघाट तालुका युवती अध्यक्ष राणी उभाड उपस्थित होते. तरी केंद्र सरकारने या निर्यात बंदीचा निर्णय तात्काळ मागे घेऊन शेतकर्यांना दिलासा द्यावा अशी कृषि पदवीधर संघटनेची मागणी जोर धरत आहे.