सिंदी (रेल्वे) : केवळरामजी हरडे कृषी महाविद्यालय चामोर्शी जिल्हा गडचिरोली येथील कृषिदूत अश्विनी अशोकराव साटोणे हिने ग्रामीण कृषी कार्यानुभाव कार्यक्रमांतर्गत गाव विखणी येथे चारा उपचारावर कार्यशाळा आयोजित केली. गायी, म्हशी, शेळी, बैल या पाळीव जनावरांसाठी काशपद्धतीने चारा उपचार करावे व जनावरांसाठी सकस पौष्टिक असा चारा कसा बनवावा यासाठी अश्विनी साटोणे हिने शेकऱ्यांची कार्यशाळा घेतली.
चाऱ्यावर युरिया किती प्रमाणात उपचार करावा व कशाप्रकारे करावा याचे संपूर्ण प्रत्यक्षित शेतकऱ्यांना करुन दाखविले. शेतकरी चारा उपचारीत युरिया वापरत नाही कारण त्यांना हे धोकादायक वाटते परंतु यातून जनावरांना सकस चारा मिळतो याचे महत्त्व समजावून सांगितले. कार्यशाळा आयोजित करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. टी. सुर्जे. सहायक प्रा. एस. एस. सरदारे, आर. जे. चौधरी, जी. एस. चाचरे यांचे मार्गदर्शन लाभले आणि कृषिदूतांनी प्रात्यक्षिक करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.