सिंदी (रेल्वे) : शहरात चांगल्या दर्जाची इंग्रजी माध्यमाची शाळा नसल्याने शहरातून विद्यार्थ्यांना बाहेर जावे लागते त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असून बऱ्याच विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी समुद्रपूर व बुटीबोरी येथे जावे लागत असल्याने शहरात इंग्रजी माध्यमाची इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतची शासकीय शाळा सुरु करावी या मागणी करीता नगरसेवक आशिष देवतळे, नगरसेविका अजया साखळे, नगरसेविका पुष्पा सिरसे, नगरसेविका बबिता तुमाने तसेच अमोल सोनटक्के, प्रभाकर तुमाने, यांनी हिंगणघाट येथील प्रहार जनशक्ती पक्षाचे विदर्भ प्रमुख गजू कुबडे यांच्या माध्यमातून शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना निवेदन दिले.
पांल्याना शिक्षणाची चांगली सोय व्हावी या करिता सिंदी शहरातील लोक नागपूर-वर्धा येथे राहण्याकरिता जात आहे तसेच बरेच पालकांची मुले हे इयत्ता १ ते १० पर्यंतच्या शिक्षणा करीता बुटीबोरी, सेलू, समुद्रपूर येथे जाणे येणे करतात त्यामुळे विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय व शहरात चांगल्या दर्जाच्या शिक्षणाकरीता शहरातच शासनाच्या वतीने शासकीय इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु करावी अशी मागणी शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.
ही मागणी मान्य करीत कोविड संपल्याबरोबर सिंदी शहरात शाळा सुरु करण्याचा प्रस्ताव मागवितो असे आश्वासन यावेळी शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिले.