गोंदिया : केवळरामजि हरड़े कृषी महाविद्यालय, चमोर्षी, गडचिरोली येथील चौथ्या वर्षातील विद्यार्थ्यांकडून कोदोबर्रा येथे ग्रामीण कृषी कर्यानूभव कार्यक्रमा अंतर्गत आझोला लागवडीबाबत मार्गदर्शन व प्रात्यक्षिक करुन दाखवीण्यात आले.
आझोला हा दुभती जनावरे , कोंबडी, आणि म्हशिसाठी अत्यंत पौष्टिक आणी सेंद्रीय खाद्य पदार्थ आहे. यामधे प्रथिने, स्निग्ध पदार्थ तसेच लोह मग्निज, तांबे, कँल्शीयम यासारखे पदार्थ असतात. त्यामूळे जनावरांसाठी तसेच दुग्ध उत्पादनासाठी हे फायदेशीर आहे.
आझोलाचा शेतीसाठी हिरवळीचे खत म्हणूनही वापर कर्ता येतो, अशी महीती विद्यार्थ्यांनी शेतकर्यांना दिली.
यावेळी विद्यार्थी मनिष कापगते, नितीनकुमार मरस्कोल्हे व इतर गावातील शेतकरी उपस्थीत होते. शेतकर्यांनी आझोल्याची लागवड शेतात करावी तसेच इतरांना यासाठी प्रोत्साहीत करावे असे आवाहन या प्रसंगी करण्यात आले.