राहुल काशिकर
पवनार : येथील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी धामनदी ओलाडुन शेतात जावे लागत होते. ही बाब लक्षात घेत माजी सरपंच यांनी आमदाराकडे शेतकऱ्यांना जाण्यासाठी फुलाची मागणी केली होती. या मागणीला यश ही मिळाले होते. मात्र गेल्या दीड वर्षापासून फुलाचे काम हे ठेकेदाराच्या मनमानी प्रमाने होत असल्यामुळे फुलाचे काम रखडले आहे. याकडे लोकप्रतिनिधी लक्ष देत फुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
वाहीतपूर – पवनार आणि इतर गावाला जोडणारा धाम नदीवर बांधण्यात येणाऱ्या फुलाचे काम हे संथगतीने होत असल्याने गामस्थळ आणि शेतकऱ्यामध्ये रोष निर्माण होत आहे. फुलाचे काम करनाऱ्या ठेकेदाराचे दिन मै ढाई कोस अश्या पध्दतीने फुलाचे काम सुरू आहे. पवनारातील अनेक शेतकऱ्याचे शेत हे नदीपलीकडे आहे. शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. शेतकरी अनेक दशकापासून फुलाचे स्वप्न पाहत होते. ते स्वप्न साकार होतांना दिसत ही होते, मात्र ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे गेल्या दीड वर्षांपासून फुल बांधकामाचे फक्त चार पीलर उभे आहे. जर असेच काम सुरू राहिले तर जवळपास दाहा वर्ष फुलाला पूर्ण करायला लागेल. फुलाच्या बांधकामासाठी 6 कोटी 27 लाख 70 हजार रुपये मिळाले आहे. मात्र या फुलाच्या कामाकडे कोणत्याही लोकप्रतिनिधीचे लक्ष नाही. त्यामुळे ठेकेदार हे आपल्या मनमानीप्रमाने फुलाचे काम करीत आहे. नदीपलीकडे पवनार येथील शेतकऱ्याचे शेकडॊ एकर शेतजमीन आहे. शेतकऱ्यांना शेतात जाण्याकरिता नावेच्या सहाय्याने नदीपत्रातून धोकादायक प्रवास करून शेत गाठावे लागते. हा धोकादायक प्रवास कधी थांबणार असा प्रश्न परिसरातील शेतकऱ्यांनी केला आहे. पूलाचे काम कधी पूर्ण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.