सेलू : तालुक्यातील शेतकर्यांनी कसबसे हाती आलेल्या सोयाबीनचे पिक कापणीला सुरवात केली असून अशातच पाऊस पडत असल्याने आणि पावसाचा अंदाज वर्तवला जात असल्याने शेतकरी हतबल झाला आहे कसबसे हाती आलेले पिक जाते की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे.
यावर्षी कोरोणाचे संकट पाहता सर्व क्षेत्रांमध्ये नुकसानीला तोंड द्यावे लागले शेती वर सर्व भिस्त असलेल्या शेतकरयांना शेतीपिकाची शाश्वती होती अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी शेतीवर मोठी आशा होती अशातच दाणे भरण्याचे अवस्थेत असलेल्या सोयाबीनचे पिक रोगाचा प्रादुर्भाव पाहता हातचे गेल्याचे चित्र निर्माण झाले अनेक शेतकऱ्यांनी शेतावर नांगर फिरवला शासनाकडून याचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले यात कसेबसे थोड्या फार उत्पन्नाची आशा असलेल्या काहीनी सोयाबीनची कापणी सुरु पण पावसाचा जोर वाढल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे यावर्षीला कापणी काढणीचा खर्च निघेल की नाही याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहे.