देवळी : तालुक्यातील दिघी (बोपापूर) गावामधील यशोदा नदीवरिल पुलाला भेगा पडल्याने रस्ता बंद करण्यात आला. त्यामुळे नदीपलिकडील शेतीवर जाण्यास खुप अडचण येत आहे. शेतकरी नदीच्या पात्रातुन पोहत शेतीवर जात आहे. मात्र महिला शेतकरी पोहून जाऊ शकत नाही त्यामुळे शेतातील कामे पुर्ण करण्यास अडचणीचा सामना करावा लागत आहे. सध्या नागरिक शेतात जीव धोक्यात घालुन जात आहे.
सोयाबीन पिक तोंडाशी आले आहे ते कापण्यासाठी मजुर शेतात नेऊ शकणार नाही तशेच शेतीमाल घरी आणू शकणार नाही पाण्यातून शेतात जाताना अनावधानाने काही झाले तर त्याला सर्वस्वी जवाबदार प्रशासन असेल अशा आशयाचे निवेदन तहसीलदार देवळी यांना शेतकर्याच्या वतीने देण्यात आले आहे.
पुलाचे बांधकाम करायला बराचसा वेळ आहे. सध्या सोयाबीन कापनीचे दिवस आल्याने तात्काळ नदीवर ढोले व मुरुम टाकुन पर्यायी रस्ता निर्माण करुण घ्यावा अन्यथा सर्व शेतकरी बाधंव देवळी तहसील कार्याला सामोर उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.
निवेदन देते वेळी उपसरपंच अमोल दिघीकर, विजय डवले, अश्वजित फुलमाळी, राजेश अवथरे, भुषण कांबळे, आशिष दिघीकर आणि शेतकरी उपस्थीत होते.