ना वारा ना पाऊस तरीही तासतासभर गायब! रोज किमान दहावेळा ब्रेकडाउन; विज वितरण विभागाचा प्रताप: भीम टायगर सेनेचा तिव्र आंदोलनाचा ईशारा

पवनार : येथील महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे विजपुरवठा वारंवार खंडीत होतो. दररोज वीजपुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने येथील ग्रामस्त त्रस्त झालेे आहे. मात्र येथील विज वितरण विभाग गाढ झोपेत आहे. नागरीकांनी वारंवार याबाबत तक्रारी करुनही येथील अभियंता यावर कोणतीच उपाययोजना करीत नसल्याने हा भोंगळ कारभार चालू आहे. महावितरणाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी लक्ष देत नागरीकांना दिलासा द्यावा अंन्यथा भिम टायगर सेना याविरोधात तिव्र आंदोलन छेडेल असा ईशारा निवेदनातून दिला आहे.
गेल्या चार महिन्यापासून गावातील विजपुरवठा काहीही करण नसताना वारंवार खंडीत होतो. सध्या नीटची परीक्षा विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग चालू आहे. मात्र यामुळे फार मोठे नुकसान सहन करावेव लागत आहे. ही खेदाची बाब असून संबधित अधकार्यांनी व्यवस्तीत नियोजन करुन समस्या मार्गी लावावी अन्यथा भीम टायगर सेना व समस्त गावकर्यांच्या वतीने तीव्र स्वरुपाच आंदोलन करण्यात येईल असा इशारा भीम टायगर सेना वर्धा तालुका उपाध्यक्ष विशाल नगराळे यांनी दिला.
यावेळी भीम टायगर सेना शाखा अध्यक्ष रवींद्र चाटे, पंचायत समिती सदस्य प्रमोद लाडे, गणेश खेलकर, प्रदीप हिवरे, लवेश बुजाडे, निलंय डफरे, संदीप नगराळे, संदीप पाटोळे, संकेत कुत्तरमरे, साहिल जिंदे, वैभव गोमासे ऋषिकेश चाटे यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here