सिंदी (रेल्वे) : केवळरामजी हरडे कृषि महाविद्यालय चामोर्शी जिल्हा गडचिरोली येथील चौथ्या वर्षातील विद्यार्थिनी अश्विनी साटोणे हिने ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत गाव विखणी येथे गुरुवारी (ता.१०) एकात्मिक कीटक व रोग व्यवस्थापन अंतर्गत कामगंध सापळे यांचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना करून दाखविले .
महाविद्यालयातील ग्रामीण कृषी कार्यानुभवाचे प्रमुख सहा. प्रा.आर. जे. चौधरी सर आणि किटकशास्त्र विषय तज्ञ सहा. प्रा.सी. ए. दुधबळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थीने हे प्रतिक्षिक करून दाखविले तसेच जैविक पद्धतीने व्यवस्थापणासाठी कामगंध सापळे याचा वापर करतात. कीटकांचा प्रादुर्भाव पिकामध्ये कमी प्रमाणात असल्यास हे सापळे अत्यंत फायदेशीर ठरते तसेच प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात असल्यास रासायनिक पद्धतीने किटकांचे व्यवस्थापन करावे आदी पुरक माहिती विद्यार्थिनी साटोने हिने उपस्थित शेतकऱ्यांना दिली व कामगंध सापळे प्रत्यक्ष शेतामध्ये लावून दाखविले.