गिरीश ठाकरे
वर्धा : चिडावणारी गरमी, हैराण करनार्या उकाड्याने गेल्या काही दिवसापासुन नागरीक त्रस्त झाले होते. आज अचानक दुपारच्या सुमारास चालू झालेल्या मुसळधार पावसाने वर्धेकरांना उकाड्यापासुन काही प्रमाणात दिलासा मिळालेला आहे.
यावर्षीच्या वर्ध्यात पाडलेला हा पहिलाच इतका धुवाधार पाऊस वर्धेकरांनी अनुभवला होता. मात्र दुपारच्या सुमारास अचानक चालू झालेल्या या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली व्यापारी लाईनमध्ये व्यापार्यांना अनेक अडचणी आल्यात तर अनेक कामाकरीता घरुन बाहेर पडलेल्या नागरीकांना या पावसाने झोडपले.
पाऊस ईतका जोरदार होता की रोडवर काही वेळातच पाणी साचल्या गेले आणि नागरीकांनी दुकाणाबाहेर उभी ठेवलेली अनेक वाहनांची चाके यावेळी पाण्याखाली बुडाली असच काहीस चित्र आज वर्धेकरांना अनुभवास आल. मात्र एक तास आलेल्या पावसाने सगळीकडे गारवा निर्माण झाला हे खर!