वर्धा : जिल्ह्यात गेल्या २०-२५ दिवसांपासून झपाट्याने कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मृतांची संख्या आणि मृत्यूदरही वाढला आहे. शासनाने मोठ्या प्रमाणात शिथिलता दिल्यापासून नागरिकांमध्ये बेफिकिरी वाढली आहे.
हात वारंवार स्वच्छ धुणे, सेनिटायझर-साबणीचा वापर, व्यवस्थित मास्क लावणे, सामाजिक अंतर राखणे, खोकताना रुमाल तोंडावर पकङणे, हस्तांदोलन-गळाभेट टाळणे, गरज नसताना घराबाहेर जाणे टाळणे या अत्यावश्यक बाबींकडे दुर्लक्ष होत आहे.
अशा परिस्थिती सामाजिक संस्था-संघटना, राजकीय पक्ष यांनी जनता कर्फ्यू करिता जनजागरण करणे आवश्यक आहे. प्रसार माध्यमांनी (प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक) जनता कर्फ्यूचा विषय लावून धरल्यास कोरोनाचा संसर्ग होण्यापासून अनेकजण बचावतील, अनेकांना मृत्यूच्या दाढेत जाण्यापासूनही आपण वाचवू शकतो.