

सेलू : सध्या मजुरांचे हाताला काम नसून त्यांना जिवण जगणे कठीण झाले आहे त्यामुळे आपले स्तरावर मनरेगा संबधी कामे काढून मजुरांचे हाताला काम देण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनचे वतीने मुख्याधिकारी सेलू यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
नगरपंचायत क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक मजुरांना कामे नसल्याने त्यांचेवर उपासमारीची वेळ आली आहे त्याचे जाँबकार्ड तयार करून त्यांना कामे उपलब्ध करून देण्यात यावे यासाठी आपले स्तरावर प्रयत्न करून शासनाकडे पाठपुरावा करावा अन्यथा शेतमजूर युनियनचे वतीने नगरपंचायत वर धडक देऊन आंदोलन करण्याचा ईशारा जिल्हा सहसचिव पांडुरंग राऊत यांनी या निवेदनाद्वारे दिला आहे.