– राहुल काशीकर
————–
वर्धा : कोरोनाच्या प्रादुभावमुळे सगळीकडे लॉकडाऊन पुकारण्यात आला होता. परिणामी खाजगी वाहनांनाही ईपासच्या माध्यमातुनच जिल्ह्याबाहेर जावे लागत होते. मात्र यात सर्वसामान्य माणुस भरडल्या जात होता. मात्र आता लालपरीने जिल्ह्याबाहेरही प्रवास करन्याकरीता कोनत्याही प्रकारची परवानगी लागनार नसल्याने मोठा दिलासा सर्वसामान्यांना मिळाला आहे.
लॉकडाऊनच्या काळात नागरीकांच्या अडचणी लक्षात घेता शासनाने जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी ईपास, मेडीकल प्रमाणपत्राच्या आधाारे जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी परवानगी मिळण्याची व्यवस्था केली होती. यात खाजगी वाहनांनी प्रवास करण्याकरीता मोठी रक्कम मोजावी लागत होती त्यामुळे सामान्य नागरिकांना चांगलाच झटका बसला होता. मात्र आता शासनाने दिलेल्या आदेशानुसार आजपासून लालपरीने जिल्ह्याबाहेर जाण्याची धाव घेतली आहे. यामुळे आता सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
मार्च महीन्यांपासून कोरोना वायरसने चांगलाच धुमाकुळ घातला आहे. यामुळे सर्वत्र लाकडाऊन पुकारण्यात आला होता. यात व्यवसायीक, सर्व छोटे-मोठे उद्योग धंदे बंद करण्यात आले होते. गेल्या पाच महीन्यांपासून लालपरीनेही धाव घेणे बंद केल्यामुळे नागरिकांना जिल्ह्यातील लाहान ‘मोठ्या गावात जाण्यासाठी सुध्दा कोणत्याच प्रकारचे वाहन उपलब्ध नव्हते यामुळे नागरिकांना जिल्ह्यातील गाव-खेड्यात जाण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत होता. मात्र आज लालपरीचे चाके पुन्हा रस्त्यावर धावल्याने आणि जिल्ह्याबाहेरी जाण्यासाठी कोणत्याही परवानगी न घेता लालपरीने प्रवास करता येणार असल्याने सामान्य नागरिकांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे.