

-प्रवीण धोपटे
——————
-कधी कधी काही निर्णय, उपय का घेतले-केले जातात, याचे कोडेच पडते. शासन-प्रशासन समग्र विचार न करता जेव्हा निर्णय घेते तेव्हा विरोधाभास, विपरित परिणाम घडतात. कोरोना विषाणु संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दुकानांना ठरवून दिलेली मर्यादित वेळ हा असाच विषय होता-आहे.
समजा आपल्या शहरात विविध प्रकारची 2 हजार आणि जिल्ह्यात 10 हजार दुकाने आहेत. ही दुकाने उघडी ठेवण्याची वेळ कमी राहील तर निश्चितच दुकानांमध्ये तुलनेने जास्त गर्दी होईल. वेळ जास्त राहील तर दुकानातील गर्दी आपसूकच कमी होईल. जर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजारातील गर्दी टाळणे हा उद्देश असेल तर तो दुकानांची वेळ मर्यादित-कमी करून कसाकाय साध्य होईल.?. हे शासन-प्रशासनाला का कळले नाही, हे त्यांचे त्यांनाच ठवूक…
दुसरे असे की अनेक लोक नोकरी, रोजगारानिमित्त सकाळीच घराबाहेर पडतात आणि साधारण सायंकाळी 5.30 ते 8 या वेळात घरी परततात. यातील अनेकांच्या घरी वृद्ध व्यक्ती, लहान मुले असतात. गृहिणी मुलांना सोडून बाजारात जाऊ शकत नाहीत. अनेक घरांत दुसरी दुचाकी नसते. त्यातच काही महिलांना दुचाकी चलविता येत नाही. दुसरा भाग असा की, घरांत कुणी ऐनवेळी पाहुणे येतात, गृहिणीना चहा-नाश्ता तर कधी जेवण तयार करावे लागते. घरात सर्वच उपलब्ध असते, असे नाही. सायंकाळी 5 आजता दुकाने बंद व्ह्ययची तेव्हा पंचाईत होऊन जायची.आता सायंकाळी 7 पर्यंत दुकाने उघडी ठेवण्याची परवानगी देण्यात आल्याने थोड़ा दिलासा मिळाला आहे. केवळ किराणा दुकानेच नव्हे तर कापड, सराफा, मोबाइल, नेट-कैफे, सलून, हार्डवेअर, गिफ्ट सेंटर, विविध रिपेअरिंग दुकाने अशा अनेक ठिकाणी सगंकाळी 5 नंतर रिकामा वेळ मिळत असल्याने जाणाऱ्यांची संख्या कमी नाही.
आणखी एक मजेदार बाब म्हणजे केशकर्तनालय व्यावसायिकांना ग्राहकांची कटिंग तर करून देता येईल; पण दाढी मात्र करता येणार नाही. सलून व्यवसायिक कटिंग केल्यावर केसंवर-चेहऱ्यावर पाणी मारतात, तेव्हा ग्रहकाच्या चेचऱ्याला त्यांच्या हातांचाा स्पर्श होतो. नाक-तोंडाशी त्यांच्या हाताचा संपर्क येतो. सलून व्यवसायिकांच्या नका-तोंडाचे अंतरही ग्रहकांपासून काही इंचावरच असते.या दरम्यान ग्रहकाशी फारसे अंतर राखणे शक्य नसते. मग कटिंग सुरू-दाढ़ी बंद,याचे लॉजिक काय उरते, असा प्रश्न सहज पडतो.
व्यपारी, व्यपारी संघटना, राजकीय पक्ष आदींनी दुकानांना वेळ वाढवून देण्याची मागणी वारंवार केली. 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी शासकीय झेंडावंदन कार्गक्रमाला पालकमंत्री सुनील केदार आले असता राजेंद्र शर्मा, प्रमोद हिवाळे, इक्राम हुसैन शेख, प्रवीण हिवरे, इद्रिस मेमन, सलिम शेख आणि
सहकाऱ्यांनी पालकमंत्री केदार यांना याविषयी निवेदन दिले आणि दुकाने 5 वाजेपर्यंतच खुली ठेव्ण्याच्या आदेशामुळे लोकांना जात असलेल्या अडचणींची सविस्तर माहिती दिली. पालकमंत्री यांना लगेच वेळ वाढविण्याचे महत्त्व पटले. त्यांनी तिथल्या तिथे जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांना दुकानांची वेळ दोन तासांनी वाढवावी, असे स्पष्ट निर्देश दिले. लगेच सुधारित परिपत्रक निघाले आणि ग्रहकांसह दुकानदारांची कोडीतून सुटका झाली. दुकानांच्या वेळात आणखी 1 तासाची वाढ केली तरी काही हरकत नाही. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गर्दी टाळणे, कमी करणे हा प्रशासन-शासनाचा उद्देश असेल तर हा योग्य उपाय आहे. तुर्तास एवढेच !..