

यवतमाळ/ परशुराम पोटे
आदिवासी जमातीच्या महिलेला मारहान करुन तिचा विनयभंग करणार्या आरोपीवर अँट्रोसिटी अँक्ट नुसार गुन्हे दाखल करुन तात्काळ अटक करण्याची मागणी सौ.मनिषा तिराणकर राज्याध्यक्षा अखिल भारतीय महिला संवैधानिक हक्क परिषद यवतमाळ यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यवतमाळ यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
पांढरकवडा तालुक्यातील मुंची रोड गवराई मांगुर्डा येथिल सौ.लिलाबाई तुळशिराम टेकाम या कोलाम आदिवासी जमातीच्या महिलेला दि.6 जुलैला त्याच गावातील स्रुजन संस्थेत काम करणारे सुमित अजय दोडके व त्याच्या सहकार्यांनी ती राहत असलेल्या ठिकाणी जाऊन तिला अश्लिल व जातीवाचक शिवीगाळ करुन तीचा विनयभंग करुन तिला मारझोड केली. यावेळी गैरअर्जदाराने दोन वाहनात शस्त्रासह सहकार्यांना आनले होते. त्यांनी या महिलेला व तिच्या कुटुंबियांना शस्त्राचा धाक दाखवुन धमकी दिली की, घडलेल्या घटनेची तक्रार पोलीसांकडे केल्यास जिवानीशी संपवुन टाकणार असे निवेदनात म्हटले आहे.त्यानंतरही हे कुटुंब पांढरकवडा पोलीस स्टेशन मध्ये गेले परंतु तिथे त्यांच्या तक्रारीची नोंद घेण्यात आली नाही,उलट त्याना तिथुन हाकलुन लावले. या घटनेची दखल अ.भा.म.सं.ह.प.च्या राज्याध्यक्ष सौ.मनिषा तिराणकर यांनी घेतली असुन त्यांनी त्या पिडीत महिलेला न्याय मिळण्याकरिता जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यवतमाळ यांना निवेदन देऊन गैरअर्जदारावर अँट्रोसीटी अँक्ट नुसार गुन्हे दाखल करुन त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहेत,तसेच पांढरकवडा पोलीस स्टेशन मध्ये त्या पिडीत महिलेची तक्रार न घेणार्या पोलीसांवरही कारवाई करावी अन्यथा संघटना रस्त्यावर उतरुन राज्यभर आंदोलन करेल व पुढिल परिस्थितीस गैर अर्जदार व संबंधित प्रशासन जबाबदार राहिल असे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.