अतित डोंगरे
मुंडीकोटा आज दि.१३ जुलै रोजी सोमवारला सकाळी गाईम्हसी चोरखमारा जंगलात समीर गेला होता. दुपारी १.३० वाजताच्या सुमार गुरेढोरे घरी हाकण्याची वेळ झाली होती. गाई म्हशी पाण्यात लावल्या होत्या. सर्व गुरे बाहेर निघाली होती. मात्र एकच म्हस पाण्यात होती. दुपारची भूकेने समिरच्या पोटात आग होतच होती. घराकडची ओढ समीरला लागली होती. तेंव्हा त्या एकाच म्हशीला पाण्या बाहेर हाकलण्याचा मोह आवरता आला नाही. समीर मिताराम पटले वय १९ वर्षीय नवतरुण म्हशीला हाकण्यास पाण्यात गेला. म्हस हाकण्याचा पाण्याचा अंदाज नवतरून समीर पटलेचा चुकला. त्याला पोहता येत नव्हते. त्यामुळे त्याला जलाशयात पाण्याने मृत्यूस कवटाळले. त्याचे मृत्यूपश्चात आई वडील भाऊ असा आप्त परिवार आहे. आकस्मिक घटनेने पटले कुटुंबियांनासह भजेपार गावात दुखःचे सावट कोसळले. त्याचे निघून जाण्याने गावात हळहळ व्यक्त केली जात. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून पोलीस ठाणेदार उद्धव डमाले यांचेे मार्गदर्शनात पीएसआय वसावे, हवालदार दीपक बांते करीत आहेत. वृत्त लिहेपर्यंत मृतकाचे उत्तरीय तपासणी करून नातेवाईकांचे सुपूर्द करण्यात आले होते.