

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ
कोरोना संदर्भात गावोगावी सर्वेक्षण करण्याचे जोखमीचे काम आशा सेविकांवर लादण्यात आले आहे. केवळ मासिक तीन हजार रुपयात राबणाऱ्या या फ्रन्टलाईन वॉरियर महिलांना शासनाने चक्क जानेवारीपासून मानधन अदा केलेले नाही. तर मानधन वाढीची अधिवेशनात घोषणा करूनही वाढ लागू करण्यात आलेली नाही. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात आशा सेविकांनी सोमवारपासून काळ्याफिती लावून कोरोना सर्वेक्षणाचे काम सुरू केले आहे. या माध्यमातून शासनाचा निषेध करतानाही आशा सेविकांनी जबाबदारी मात्र झटकलेली नाही.