पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
विधान परिषदेची निवडणुकीची धोरण ठरविण्यासाठी राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची बैठक होत असल्याची माहिती मिळाली आहे. या निवडणुकीत विधानसभेतील आमदार हे मतदार असून ते नऊ सदस्य हे विधान परिषदेवर पाठविणार आहेत. त्यासाठी येत्या 11 मे पासून अर्ज भरायचे आहेत.
सध्याच्या पक्षीय बलाबलानुसार भाजपला चार आणि महाआघाडीला सहा जागा मिळू शकतात. काँग्रेस सहावी जागा लढावी यासाठी आग्रही आहे.
मात्र शिवसेना आणि एनसीपी नेते मात्र त्यास अनुकूल नाहीत. याच निवडणुकीतून उद्धव ठाकरे विधान परिषदेचे सदस्य होणार आहेत. त्यामुळे ही निवडणूक बिनविरो व्हावी यासाठी सेना आणि राष्ट्रवादी प्रयत्नशील असल्याची माहिती आहे.शिवसेनेला दोन जागा मिळत आहेत. त्यात ठाकरे यांचे नाव आहेच. दुसऱ्या जागेसाठी नीलम गोऱ्हे यांचे नाव ठरल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. राष्ट्रवादीला दोन जागा मिळतील. तीनही पक्षांत काॅंग्रेसच्या जागा कमी असल्याने त्यांना एकच जागा द्यायची दोन्ही पक्षांची तयारी आहे. काॅंग्रेसला मात्र दोन जागा हव्या आहेत. दोन-दोन आणि एक या सूत्रावर काॅंग्रेस नेते खूष नाहीत. त्यामुळे ही बैठक होणार आहे.
तसे झाले तर ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळते. निवडणूक घ्यायची म्हटल्यावर अधिवेशन बोलवावे लागेल. आमदारांना एकत्र ठेवावे लागेल. कोरोनाच्या साथीत हे टाळण्यासाठी निवडणूक बिनविरोध व्हावी, असा सेनेचा प्रयत्न आहे.शिवाजी पार्क परिसरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ,कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची बैठक झाली.राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ,शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे ,अनिल परब आणि मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 27 मे पूर्वी विधिमंडळाच्या दोन्ही पैकी एका सभागृहाचे सदस्य होणे अपेक्षित असल्याने निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारवरील अनिश्चितता संपुष्टात आली आहे. या नऊ जागांसाठी 29 मतांचा कोटा आहे. भाजपकडे 115 आमदार असल्याने त्यांचे चार आमदार निवडून येऊ शकतात. महाआघाडीचे 173 आमदार असल्याने त्यांचे पाच आमदार निवडून येतील.
विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या जागा पुढीलप्रमाणे
भाजप – ३, राष्ट्रवादी काँग्रेस – ३, काँग्रेस – २, शिवसेना – १ असा रिक्त जागांचा तपशील आहे.
शिवसेना- १. डॉ नीलम गोऱ्हे (उपसभापती, विधान परिषद), भाजप- १. श्रीमती स्मिता वाघ, २. अरुण अडसड, ३. पृथ्वीराज देशमुख, राष्ट्रवादी- १. हेमंत टकले, २. आनंद ठाकूर, ३. किरण पावसकर, काँग्रेस- १. हरिभाऊ राठोड, २. चंद्रकांत रघुवंशी (निवडणूक आधी राजीनामा दिला आहे).
पक्षीय बलाबल पुढीलप्रमाणे : भाजप – १०५, शिवसेना – ५६, राष्ट्रवादी काँग्रेस – ५४, काँग्रेस – ४४, बहुजन विकास आघाडी – ३, समाजवादी पार्टी – २, एम आय एम – २, प्रहार जनशक्ती – २, मनसे – १, माकप – १, शेतकरी कामगार पक्ष – १, स्वाभिमानी पक्ष – १, राष्ट्रीय समाज पक्ष – १, जनसुराज्य पक्ष – १, क्रांतिकारी शेतकरी पक्ष – १, अपक्ष – १३ निवडून येण्यासाठी प्रत्येकाला आवश्यक असेल {२८८/(९+१) = २८.८} म्हणजेच २९ मते. याप्रमाणे निवड होणार असल्याने रिक्त झालेल्या जागांवर भाजपा आपल्या जागा राखेल तर शिवसेनेची एक जागा वाढणार आहे.