राज्यातील करोनाबाधितांचा आकडेत वाढ, चिंता वाढताच शरद पवारही मैदानात

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर

मुंबई : राज्यातील करोनाबाधितांचा आकडा ५२ वरुन ६३ वर गेल्यानंतर प्रत्येकाची चिंता वाढली आहे. राज्य सरकारला कायम मार्गदर्शन करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही आता या परिस्थितीवर मात करण्यासाठी मैदानात उतरले आहेत. शरद पवारांनी स्वतः परिस्थितीचा आढावा घेत केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांना फोन केला आणि २० मिनिटे त्यांनी चर्चा केली. करोना चाचणीसाठी महाराष्ट्र सरकारला केंद्र सरकारच्या मदतीची गरज आहे.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि परिस्थितीची माहिती दिली. राज्य सरकार सर्व वैद्यकीय महाविद्यालयांना उपकरणे देण्यासाठी तयार आहे, पण या वैद्यकीय महाविद्यालयांना करोना चाचणीची किट उपलब्ध करुन देण्यात यावी यासाठी केंद्र सरकारकडे मागणी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here