ऋषी सहारे
कार्यकारी संपादक
कोरची दि13 जुलै
तालुक्यात कोरची व कोडगुल भागात कमी दाबाचा व अनियमित वीज पुरवठा होत असल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत वारंवार निवेदने देऊनही वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करतात त्या मुळे अनियमित वीज पुरवठाची समस्या सुटत नाही त्या मुळे महावितरण कंपनी विरोधात 14 जुलैला कोरची – कुरखेडा मार्गावर बेमुदत चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असा इशारा तालुक्यातील वीज ग्राहकांनी तहसिलदार यांना निवेदन दिले होते या पार्श्वभूमीवर विद्युत वितरण कंपनीचे वरिष्ठ अधिकारी आंदोलक विद्युत ग्राहक यांची तहसीलदार कोरची यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समन्वय बैठकीत कार्यकारी अभियंता विजय मेश्राम यांनी लिखित आश्वासन दिले
कुरखेडा कोरची येणारी विद्युत पुरवठा खूप मोठ्या जंगलातून येत असल्याने ब्रेक डाऊन अटेंड करण्यासाठी अडचणी निर्माण होतात त्यामुळे ही विद्युत जोडणी कुरखेडा कोरची रस्त्याच्या कडेला शिफ्ट करण्यात यावी,
कुरखेडा कोरची विद्युत जोडणी रस्त्याच्या कडेला शिफ्ट करेपर्यंत देवरी वरून विद्युत पुरवठा नियमित सुरू ठेवण्यात यावा,कोरची हे तालुका मुख्यालय असल्याने सर्वच विभागाचे कार्यालय इथे आहेत त्यामुळे कोरची व तहसील कार्यालय ग्रामीण रुग्णालय फिडर वेगळा करण्यात यावा,कोरची येथील सब सेंटर ला 3.15 चा ट्रांसफार्मर लावलेला आहे तोही रिपेरींग केलेला आहे इथे तर पाच पाच पॉईंट चे दोन दोन ट्रान्सफर लावने गरजेचे आहे 3.15 चा ट्रांसफार्मर असल्यामुळे होल्टेज खूप मोठी अडचण निर्माण झाली आहे पाच चे ट्रांसफार्मर ताबडतोब लावण्यात यावे
बेतकाठी गावात पंपाने शेती खूप जास्त प्रमाणात केली बेतकाठी गावात दोन ट्रांसफार्मर आहेत त्यात एक शंभरचा व दुसरा 25 चा आहे 100 च्या ट्रांसफार्मरवर 75% गाव चालतो व 25 ट्रांसफार्मर 25 टक्के गाव व एजी पंप चालतात 25 चा ट्रांसफार्मर हा वर्षातून दोन-तीनदा जळून जातो त्यामुळे एजी पंपासाठी सेपरेट ट्रांसफार्मर लावणे गरजेचे आहे या संपूर्ण समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊ पाचवी प्रश्न व कोडगुल भागात वीज पुरवठा नियमित सुरू ठेवण्यात येणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले असून या संदर्भात चर्चा केली
त्या मुळे महावितरण कंपनी विरोधात चक्का आंदोलन मागे घेण्यात आले आहे ,
यावेळी तहसिलदार सी आर भंडारी कार्यकारी अधिकारी विजय मेश्राम, पोलिस उपनिरीक्षक महेश कोडूंभैरी, सहायक अभियंता प्रफुल्ल कुळसुगें, माजी नगराध्यक्ष नसरुभाऊ भामानी, सरपंच संघटना अध्यक्ष हेमंत मानकर, सभापती श्रावन मातलाम,सरपंच संघटना उपाध्यक्ष राजेश नैताम जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष सदरूऊददीन भामानी,आंनद चौबे, घनशाम अग्रवाल, प्रा देवराव गजभिये, हकीमभाई शेख सामाजिक कार्यकर्ते वशीम शेख सरपंच केरामी सरपंच हीळामी, सरपंच गीरजाताई कोरेटी, प्रमेशवर लोहंबरे, राहूल अंबादे आदी उपस्थित होते.