

पवनार : ज्येष्ठ गांधी-विनोबा विचार कालिंदीताई सरवटे यांचे वृद्धापकाळाने सोमवार (ता. ७) सायंकाळी १०.३० वाजता विनोबा भावे आश्रम पावनार येथे वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्यावर पार्थिवावर मंगळवारी सकाळी ८ वाजता आश्रम परिसरात अंत्यसंस्कार करण्यात आले.
कालिंदी ताई मूळच्या इंदोरच्या रहिवासी होत्या आचार्य विनोबा भावे यांची भूदान चळवळ १९६० ला मध्यप्रदेश मध्ये चालू असताना त्या यात्रेत सहभागी झाल्या आणि त्यानंतर शेवटपर्यंत त्या भूदान चळवळीत विनोबांच्या सोबत पदयात्रेत होत्या. विनोबांच्या भाषणांचे सर्व नोट्स त्या ठेवत होत्या त्या नोट्स त्या पत्रिका या मासिकाकरिता तयार करून ठेवण्याचे काम करीत होत्या.
येथील ब्रह्मविद्या मंदिराच्या मैत्री मासिकाच्या संपादकाचे काम त्यांनी सांभाळले होते. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी विनोबांचे विचार जगभरात पोहोचवण्याचे काम केले. विनोबांच्या विचारावर अनेक पुस्तके त्यांनी लिली आणि प्रकाशित केली. त्यातील अहिंसा की तलाश हे आणि त्याचे इंग्रजी भाषेतील ‘मूड बाय लव’ Moved bye love…हे पुस्तक जगभर प्रसिद्ध झालेले आहे. त्या भूदान चळवळीपासून तर आतापर्यंत पावनार येथील ब्रह्मविद्या मंदिरात होत्या.