
पवनार : येथील युवकाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना सोमवार (ता. ३१) पावनार येथे घडली. संजय ज्ञानेश्वर उराडे वय ३७ वर्षे रा. पावनार असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. संजय याने घरी कोणी नसताना पाहून शनिवार (ता. २९) घरी असलेले उंदीर मारायचे औषध प्राशन केले घटनेची माहिती मिळताच त्याला उपचाराकरता सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र सोमवारी त्याचा सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. आत्महत्येचे कारण अद्याप काढलेले नाही.