
पवनार : येथील धाम नदीपात्रातील प्रदूषणाने यावर्षी कळस गाठला आहे. नदीपात्रात पलकीडोहात मोठ्या प्रमाणात मूर्ती विसर्जन झाल्याने गाळ साचून पाण्याचा प्रवाह अवरुद्ध झाला आहे. या साचलेल्या गाळात झाडे, वेली वाढल्याने नदिपात्रच नाहीसे झाले आहे. याचा मोठा परिणाम पाण्यात राहणाऱ्या जलचारांवर होत आहे. परिणामी, पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. नदीचे पाणी पूर्णपणे दूषित झालेले आहे. प्रदूषणामुळे धाम नदीचा श्वास गुदमरू लागला आहे. या समस्येवर जिल्हा प्रशासनाकडून तत्काळ उपाययोजना न झाल्यास नागरिकांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागणार आहे.
बारमाही वाहत असल्याने जिल्ह्यासाठी धाम नदी ही जीवनदायीनी ठरलेली आहे. मात्र मानवी कृत्यामुळे या नदीचा प्रवाह ठीक ठिकाणी बंद झाल्याचे पाहायला मिळते. याचा मोठा परिणाम या नदीपात्रात राहणाऱ्या जलचारांवर होत आहे त्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. शासन व प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात धाम नदी स्वच्छता अभियान राबवण्यात आले होते यात अनेक निसर्गप्रेमी आणि सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला होता. त्याचा मोठा गाजावाजा करण्यात आला होता. मात्र ते फोटोसेशन पुरते मर्यादित राहिले त्यानंतर धाम नदीच्या स्वच्छतेसाठी कोणी पुढाकार घेतलेला नाही. त्यामुळे सद्या नदीपात्राच्या या परिसरात घानीचे सम्राज निर्माण झाले आहे.
धाम नदीपात्र परिसरात मूर्ती विसर्जनाकरता स्वतंत्र विसर्जन कुंडाची निर्मिती करण्यात आलेली आहे मात्र तरीही प्रशासनाच्या संमतीने शेकडो मूर्ती या पालखीडोह परिसरात विसर्जित केल्या जातात त्यातून या परिसरात मोठ्या प्रमाणात गाळ साजला जातो. विसर्जनानंतर हा गाळ उचलल्या जात नसल्यामुळे हे पात्र स्वच्छ होत नाही त्यावर झाडे झुडप वाढून त्यात कचरा साठून त्यातून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटते ते पाणी सदून त्यात जांत पडतात गेल्या काही वर्षापासून हाच प्रकार येथे चालू आहे प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे हा प्रकार सध्या या ठिकाणी चालू आहे. पावएक पर्यटन पर्यटन स्थळ आहे मात्र या पर्यटन स्थळा भेट देणाऱ्या पर्यटकांना या गंधकीचा दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.
पालखीडोह प्रदूषित….
धाम नदीतील पलकीडोह हा परिसर पूर्वी स्वच्छ राहत असल्यामुळे याठिकाणी वाहते आणि स्वच्छ पाणी राहत होते त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात गावातील मुले या ठिकाणी पोहण्याचा सराव करीत होते तशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली होती. या परिसरात नदीत उतरण्यासाठी पायऱ्या आणि नदीपात्रात उडी घेण्यासाठी ओटा तयार करण्यात आला होता. यावरून मुले सुर मारत पोहण्याचा सराव करीत होते. मात्र सध्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला असल्याने येथील पाणी प्रदूषित झालेल्या आहे शिवाय या संपूर्ण नदी परिसरात शेवाळ वाढल्याने हे नदीपात्र पूर्णपणे झाकला गेलेले आहे त्यामुळे आता या ठिकाणी मुलांना होण्याचा सरावही करता येत नाही. हा परिसर पूर्णपणे गटारगंगा झाल्याने नदीपात्रात उतरण्याची कोणाचीही इच्छा होत नाही.
प्रतिक्रिया…
नदीपात्रात साचलेला गाळ काढण्यासाठी आणि परिसर स्वच्छ करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांना निवेदनातून मागणी करनार आहों लवकरच ते आमची मागणी मान्य करतील आणि नदीच्या सफाई करता संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देतील त्या माध्यमातून लवकरात लवकर धाम नदीची स्वच्छता करण्यात येईल आणि परिसर स्वच्छ होईल.
नितीन कवाडे, महामंत्री भाजपा वर्धा तालुका
विसर्जन कुंड असतानाही धामनदीपत्रात मूर्ति विसर्जन झाल्याने मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला आहे आणि त्यातून मोठ्या प्रमाणात नदीपात्र प्रदूषित झालेले आहे मात्र प्रशासनाचे याकडे सर्रास दुर्लक्ष होत आहे. शासन प्रशासनाने नदीसापाईचे केवळ फोटोसेशन केलेले आहे. धाम नदी परिसरात येणाऱ्या पर्यटकांना आणि गावातील नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
विशाल नगराळे, जिल्हा उपाध्यक्ष भिम टायगर सेना वर्धा