
सेलू : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने शहरातील रेहकी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा मनविसे वर्धा जिल्हा अध्यक्ष शुभम दांडेकर यांच्या नेतृत्वात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी, राज्य उपाध्यक्ष किशोर सरायकर, नगरपंचायतचे सभापती शैलेंद्र दफ्तरी, मनसेचे जिल्हाध्यक्ष शंकर पोटफोडे, मनविसेचे वर्धा जिल्हाध्यक्ष शुभम दांडेकर, जिल्हा उपाध्यक्ष नितीन अमृतकर, दीपचंद चौधरी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुहासिनी पोहाणे, श्रेयस शर्मा सर, अमित चापडे सर, अंबुज पांडे सर, मनसेचे तालुकाध्यक्ष हरिश भस्मे, प्रथमेश बोरकर आदी मान्यवर यावेळी प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित होते. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही स्थानिक रेहकी चौकात शिव जन्मोत्सव सोहळ्याचे मोठ्या थाटात आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विविध प्रकारच्या स्पर्धा, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रेहकी येथील ओम साई बाल भजन मंडळाच्या बालकलाकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित आरती, पोवाडा, गितांसह भजने सादर केलीत.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये शालेय हॉकी स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या संघात निवड झालेल्या चैताली शंकरराव गुजरकर, महाराष्ट्र राज्याच्या लंगडी संघात निवड झालेल्या सुहानी सुधाकर नेहारे, वंशिका प्रमोद मोहिजे, नंदिनी सचिन सावरकर, अमृता विवेक भोयर, श्रॄतिका नंदकिशोर वांदिले, कल्याणी सुरेशराव झाडे, प्रिया साहेबराव कोल्हे, रेहकी येथील ओम साई बाल भजन मंडळाचे संचालक वैभव श्रावण कडूकर, तबलावादक सक्षम सचिन धानकुटे तसेच राष्ट्रीय खेळाडू घडविणाऱ्या दीपचंद चौधरी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुहासिनी पोहाणे यांचा शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी रेहकी चौकात भव्य अशा महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण मुजबैले यांनी तर आभार मयुर दांडेकर यांनी मानले. कार्यक्रमाला शिवभक्तांसह, महाराष्ट्र सैनिक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हरीश भस्मे, मुकुल खोडके, ओम मिश्रा, सतीश जगताप, विकेश नागोसे, नितीन देवरे, राहुल शिंदे, पंकज झाडे, रोहण डायरे, गौरव भोंडवे, प्रज्वल लाडे, आयुष लिल्लारे, शुभम नेहारे व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.