
वर्धा : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंतीनिमित्त महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात अभिवादन करण्यात आले. प्रशासकीय भवनात आयोजित कार्यक्रमावेळी कुलगुरू प्रोफेसर हनुमानप्रसाद शुक्ल यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या छायाचित्राला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचे साहस, शौर्य, स्वराज्य स्थापना तसेच कुशल प्रशासकीय धोरण यांचे स्मरण करण्यात आले. याप्रसंगी विश्वविद्यालयाचे अधिष्ठाता, कुलसचिव, वित्त अधिकारी , अध्यापक, कर्मचारी, शोधार्थी तसेच विद्यार्थ्यांनी पुष्प अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले.