

पवनार : पौराणिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पवनार गावातील ऐतिहासिक वास्तू इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. मोगल सम्राट शहाजान यांच्या राजवटीत १६२७ ते १६५८ दरम्यान उभारण्यात आलेला ‘दिल्ली दरवाजा’ शेवटच्या घटका मोजत आहे. या वास्तूचा एक-एक भाग पडुन काळाच्या पडद्याआड जात आहे. मात्र पवनार येथील या एकमेव ऐतिहासिक वास्तूचे सौरक्षण व्हावे याकरिता प्रशासनाकडून चलडकलपणा होत आहे. लोकप्रतिनिधी याबाबत उदासीन असल्याची खंत इतिहास प्रेमी व्यक्त करीत आहे.
‘दिल्ली दरवाजा’ ही ऐतिहासिक वास्तू नामषेश होन्याच्या मार्गावर असल्याचे वृत्त दैनिक ‘सकाळ’ने वारंवार प्रकाशित करुन याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते याची दखल घेत येथील माजी सरपंच अजय गांडोळे यांनी सात वर्षापूर्वी राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्याकडे ही मागणी लावुन धरली व त्यांच्या प्रयत्नांनी या ऐतिहासिक वास्तू संगोपनाकरता ‘दिल्ली दरवाजा’च्या दुरुस्तीसाठी सेवाग्राम विकास आराखड्याअंतर्गत १ कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला मात्र सात प्रशासनाकडुन होत असलेल्या दिरंगायीमुळे अद्याप कोणताही प्रकारच्या दुरुस्तीचे काम चालू झालेले नांही. प्रशासनाकडुन आसाच विलंब होत राहील्यास ही वास्तू खाली कोसळुन नष्ट होनार आहे.
विविध राजा-महाराजांचे आणि मोगल सम्राटांचे आजच्या विदर्भ भुभागावर अधिराज्य होते. या ऐतिहासिक पाऊलखुणा ज्या भागांत शिल्लक राहिल्या आहते त्यात पवनार परिसराचा समावेश आहे. प्रवरसेन द्वितीय यांच्या कार्यकाळात म्हनजे इ.स. ४२० ते ४५० या काळात त्यांच्या साम्राज्याची राजधानीच पवनार गाव होते. उत्खननात मिळालेल्या ताम्रपत्रात असा उल्लेख आहे. विदर्भभूमीत आणि पर्यायाने ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पवनारवर मुस्लीम राज्यकर्त्यांचा अमल होता. इ.स. १६२७ ते ६५८ या काळात मोगल सम्राट सहाजानने विदर्भावर सत्ता असणार्या गोंड राजांचा पराभव केला. गोंड राजांनी शहाजानचे मांडलिकत्व मान्य करुन त्यास ठराविक महसुल देण्याचे मान्य केले.
त्याबदल्यात शहाजानने गोंड राजांच्या प्रांताला लष्करी सुरक्षा बहाल केली होती. याच कारणाने शहाजानने गोंड राजांच्या संरक्षणार्थ पवनार येथे लष्करी ठाणे निर्माण केले होते. लष्करी ठाण्याला संरक्षणाच्या दृष्टीने गोलबंद करण्याकरिता चारही बाजूंनी प्रवेशद्वार उभारण्यात आले होते. पुढे राजेशाही संपुष्टात आली आणि चारपैकी तीन गेट जमीनदोस्त झाले. वैभवशाली इतिहासाचा पुरावा म्हणून उरलेल्या ‘दिल्ली दरवाजा’चीही वाताहत सुरु झाली संध्या दिल्लीदरवाजा शेवटचे आचके देत आहे…….
पुरातत्व विभागाच्या अडथळा नाही…
पुरातत्व विभागाच्या वतीने या दिल्ली दरवाजाची पाहनी करण्यात आली. ही वास्तू पुरातत्व विभागाच्या हद्दीत येत नसुन ही वास्तू किल्ल्याचा एक भाग आहे आणि या वास्तूचे संगोपण करण्यात पुरातत्व विभागाची कोणतीही अडचण नसल्याचे पुरातत्व विभागाने स्पष्ट केले आहे.असे असले तरी लोकप्रतिनिधींचे याकडे झालेले दुर्लक्ष आणि प्रशासकीय अनास्थेमुळे या कामाला अद्याप गती मिळाली नाही……
प्रतिक्रिया….
पवनार या गावाला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. दिल्ली दरवाजा ही ऐतिहासिक वास्तू शेवटच्या घटका मोजत आहेत या वास्तूचे जतन व्हावे याकरता मी वारंवार आमदार पंकज भोयर यांच्याकडे मागणी लाऊन धरली आणि त्यांच्या प्रयत्नातुन १ कोटीचा निधीही मंजुर झाला. मात्र प्रशासकिय अनास्थेमुळे काम रखडले आहे.
अजय गांडोळे, माजी सरपंच ग्रामपंचायत पवनार