राजू शंभरकर पदोन्नती देऊन सन्मानित; संवेदनशील ठिकाणी दिली सेवा

सेलू : तालुक्यामधील वडगाव (जंगली) येथील रहिवासी राजू बापूराव शंभरकर यांना सीआरपीएफ मध्ये पोलीस निरीक्षक या पदावर पदोन्नती मिळाली. १ एप्रिल १९८८ मध्ये त्यांनी शिपाई या पदापासून सुरुवात केली.

त्यांनी ३७ वर्षाच्या आपल्या सेवेमध्ये गडचिरोली, छत्तीसगड, जम्मू-काश्मीर, नागालँड, मणिपूर अशा संवेदनशील ठिकाणी आपली सेवा दिली. यासाठी त्यांना विशेष पोलीस पदक देऊन सन्मानित सुद्धा करण्यात आले आहे. सीआरपीएफ ग्रुप मधील कमांडेड जगदीश प्रसाद भलाई आणि द्वितीय कमांडेड अधिकारी मनीष महाले यांच्या हस्ते त्यांना पदोन्नती देऊन सन्मानित करण्यात आले आहे. सध्या ते १०७ आरएएफ (सीआरपीएफ) बटालियनमध्ये कार्यरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here