
वर्धा : गृहमंत्रीअमित शहा यांनी संसदेमध्ये आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर एक फॅशन हो गया इसके बजाय इतने बार भगवान का नाम लेते तो सात जनम तक स्वर्ग मिल जाता असे असंवैधानिक वक्तव्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बद्दल केले. या वक्तव्याचा जाहीर निषेध करीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ बहुजन समाज पार्टी वर्धा जिल्ह्याचे वतीने निदर्शने आंदोलन करण्यात आले.
गृहमंत्री अमितशाह यांनी देशाची माफी मागून गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा. यामागणीसाठी बसपचे प्रदेश महासचिव डॉ. मोहन राईकवार, जिल्हाध्यक्ष अनोमदर्शी भैसारे यांचे नेतृत्वात तीव्र निदर्शने करण्यात आले. यावेळी जिल्हा प्रभारी सुदेश जवादे, कवडूजी मेश्राम, जिल्हा महिला जिल्हाध्यक्ष मंदाताई नाखले, जानराव ठोंबरे, उमेश म्हैसकर, सिद्धार्थ डोईफोडे, विजय ढोबळे, सिद्धार्थ ढेपे, सुरेश दुधे, विजय ढोबळे, अरुण डांगे, दीपक भगत, शरद वानखेडे, विवेक नाखले, प्रज्ञा दुपट्टे, कल्पना भगत, वैशाली कांबळे, क्षमाताई गायकवाड, प्रियाताई वंजारी, हेमलता शंभरकर, अनिता पारिसे, मायां शंभरकर, सुरेश कांबळे, गेंदलाल ओंकार, निखिल भगत, ईश्वर पाटील, प्रमोद पखाले, गणेश बावणे, राकेश कांबळे, विवेक गवळी, प्रदीप हाडके, मोरेश्वर जवादे, सचिन मुळे, ढोले, किशोर मेंढे, वीरेंद्र पाटील, राजेश चन्ने,अंबादास मसराम, विशाल रंगारी, विनायक पाटील यांच्यासह मोठ्या संखेने कार्यकर्ते उपस्थित होते.