वर्धा : रस्त्याने जात असताना वृद्ध व्यक्ती रस्त्याच्या कडेला पडून असल्याचे निदर्शनास येताच त्या व्यक्तिची माहिती घेत त्याला मदतीचा हात देत जिल्हा सामान्य रुग्णालयात घेवून जात येथील भिम आर्मीचे जिल्हा अध्यक्ष आशिष सोनटक्के आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या वृद्ध व्यक्तिवर उपचार करीत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनीर्वाण दिनी खऱ्या अर्थाने अभिवाद केल्याची घटना शुक्रवार (ता. ६) रोजी अनेकांनी उनुभवली. त्यांच्या या कार्याने एका वृद्ध व्यक्तिचे प्राण वाचले आहेत.
6 डिसेंबर रोजी भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी जात असताना भिम आर्मीचे जिल्हा अध्यक्ष आशिष सोनटक्के यांना रेल्वे स्टेशन शास्त्री चौक येथे एक वृद्ध व्यक्ती पेट्रोल पंप जवळ झोपून असल्याचे दिसून आले. त्याची विचारपूस केली असता दोन-तीन दिवसापासून याच ठिकाणी हा वृद्ध व्यक्ती पडून असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यांनी लगेच आपल्या सहकारी मित्रांना आणि सेवाभावी संस्थाना फोन लावून माहिती दिली. त्यांच्याकडून माहिती मिळाली त्याना येण्यास वेळ लागत असल्याने 112 वर फोन लावून माहिती दिली. या घटनेची माहिती त्वरित पोलीसंना देण्यात आली. यावेळी पोलिस कर्मचारी धम्मा सेलकर यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन चोकशी केली. कोणत्याही गोष्टीची वाट न बघता वृद्ध व्यक्तिला ऑटोमध्ये टाकून त्याला सामान्य रुग्णालयात घेऊन जात त्याच्यावर त्वरित उपचार सूरु केले.
त्या वृद्ध व्यक्तिच्या पायाला गंभीर दुखापत झ्याल्याचे दिसून येत होते. पायाचा एक्सरे केल्यानंतर डॉक्टरांनी पायाची हड्डी तुल्याचे सांगीतले. त्यानंतर या व्यक्तिला रुग्णालयात भरती करून त्याचा नातेवाईकांचा पोलीसांकडून शोध घेतला आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहचण्यास सांगितले. त्यांचे नातेवाईक रुग्णालयात पोहचल्यानंतर त्याच्या स्वाधीन करून दिले. त्यांच्या कुटींबीयांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. यावेळी पोलिस कर्मचारी धम्मा सेलकर, कमलेश बडे, कमलेश उमरे, अंकुश भोयर, हरीश कळंबे, बंटी रंगारी, आत्मनिर्भर बहुउद्देशीय सामाजिक संस्था, वर्धा अध्यक्ष, भिम आर्मीचे जिल्हा अध्यक्ष आशिष सोनटक्के यांनी या कार्यात मोलाचे सहकार्य केले. हेच आज महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना खऱ्या अर्थाने अभिवादन आहे असे त्यानी सांगितले.