वर्धा : वंदणीय राष्टूसंत श्री तुकडोजी महाराजाचे ग्रामगीतामय रचनात्मक विचार जन सामान्य लोकांपर्यंत जाण्यासाठी संपूर्ण आयुष्य ज्यानी वं.राष्टूसंताच्या प्रचार कार्यात व्यतीत केले असे आध्य ग्रामगीताचार्य रामकृष्ण दादा बेलुरकर विचार प्रतिष्ठान नागपुर तर्फ ता. ४ व ५ जानेवारी २०२५ ला आदर्श ग्राम निर्माण संमेलन संपन्न होत आहे. त्या अनुषंगाने वायगाव निपानी येथील श्री गुरुदेव जनजागृती सेवा मंडल तर्फे वायगाव निपानी येथील स्मशानभूमीत आज दिनांक ७ ला ग्राम स्वच्छता अभियान करुन ग्राम निर्माण कार्याचा शुभारंभ करण्यात आला.
वं.राष्टूसंत श्री तुकडोजी महाराज याचे रचनात्मक कार्य जनसामान्यांपर्यंत जाण्यासाठी आज श्रमदान करण्यात आले सर्वस्वी श्री कृष्णाजी डबुरकर, रमेशराव किनगावकर पांडूरंग गुजरकर, मोरेश्वर मानकर, डॉ. मनोहर शिंदे, वामन मते, प्रफुल्ल मते, विलासराव पाझारे, बाबाराव शिवरे, गणेशराव पराते, सुरेद बेलुरकर यानी सकाळी स्मशानभूमीत स्वच्छता अभियान राबविले यानंतर येणार्या प्रत्येक रविवार ग्रामवासीयांनी श्रमदानाचा संकल्प केला. त्यानंतर संपूर्ण वर्षभर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी हा उपक्रम राबविण्यात येणार आहेत आध्य ग्रामगीताचार्य रामकृष्ण दादा बेलुरकर विचार प्रतिष्ठान नागपुर तर्फे जानेवारीच्या चार व पाच तारखेला आदर्श ग्रामनिर्माण संमेलनचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण गावकरी व बचत गटातील महीलानी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन प्रतिष्ठानचे सदस्य सुरेद बेलुरकर यानी केले आहे.